घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य Part 7
*_या ध्येयापर्यंत आपण जाऊ शकतो.त्यासाठी एकसंघ नसलेल्या समाजाने एकत्रितपणे एकसंघत्वाकडे जाण्याचा विचार केला पाहिजे.जे मुख्यप्रवाहात समील होण्यास तयार नाहीत, त्यांनाही आपण प्रवाहात सामील करू,त्यासाठी इतरांना भीती वाटेल,भयप्रद वाटेल अशा शब्दांना,घोषणांना दूर ठेऊ म्हणजे आपला एकसंघत्वाकडे होणारा प्रवास सुकर होईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका उच्च दर्जाच्या मूल्यांचे आणि मुत्सद्दीपणाचे दर्शन घडविणारी होती.मसूदा समितीचे अध्यक्ष हे भारतीय राज्यघटनेचे जनक ठरले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.घटना समितीमध्ये झालेल्या विविध चर्चेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली भाषणे वाचली की,हे सर्व ध्यानी येते. राज्यघटनेच्या उद्दिष्टांच्या ठरावापासून ते घटनेला संविधान सभेची मान्यता मिळेपर्यंत केलेली त्यांची सर्व भाषणे त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या ध्यासाचा आविष्कार होता. नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये,केंद्र आणि राज्याचे अधिकार,अल्पसंख्य जमातींचे संरक्षण आणि मागास जाती-जमातीसाठी विशेष तरतूदी,राष्ट्रपतींचे स्थान,अधिकार आणि राज्यपाल नियुक्ती, अधिकार,न्यायालयाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या तरतुदी, महानगरपालिका,नगर पालिका,ग्रामपंचायतीच्या तरतुदी,लोकसेवा आयोग, रचना,स्वरूप व कार्य,जल आयोग रचना,स्वरूप,कार्य, ऊर्जाआयोग रचना,स्वरूप, कार्य,राज्या-राज्यातील राजभाषा,संघराज्याची भाषा अशा अनेकविध तरतुदी करताना या देशाच्या एकसंघतेचा विचार सतत समोर ठेवून त्यांनी कार्य केले. त्यांना हे करावे लागले. विशाल देशाची घटना बनविताना या देशाला 'राष्ट्र ' बनवायचे आहे हे भान असावे लागते.त्यांनी तर इतरांना याचे भान दिले.सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक विषमता संपविण्यासाठीचे संविधान त्यांनी दिले.२५नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत त्यांचे भाषण झाले.या देशाचे वास्तव आणि त्याआधारे या देशाचे भवितव्य सांगणारे हे भाषण ठरले.या देशाच्या सुपुत्रांनी यापुढे कोणताही हिंसात्मक मार्ग न अवलंबता सनदशीर मार्गाचा अवलंब करावा,असे आवाहन त्यांनी केले.संविधान सभेतील चर्चेचा आढावा घेत त्यांनी ५५ मिनिटांचे भाषन केले.धीरगंभीर आवाजातील भाषण सारी संविधान सभा, गॅलरीतील प्रेक्षक श्वास रोखून हे ऐकत होते.त्यांनी भाषण संपविले.तेव्हा सर्वांनीच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला._*
भाग:-सात
घटनेचे_शिल्पकार_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर!
Comments
Post a Comment