Posts

Showing posts from December, 2020

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य

Image
    केवळ कायद्याच्या तांत्रिक तरतुदीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरत  नाहीत तर संपूर्ण भारतातील लोकांच्या भविष्याचा विचार करीत घटनेत तरतुदी केल्या आहेत.एकसंघ,एकात्म देश निर्माण करण्याचे स्वप्न या घटनेत ग्रथित केलेआहेत.१७ डिसेंबर १९४६ रोजी संविधानाच्या साध्य आणि उद्दिष्टांच्या प्रस्तावावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉ .राजेंद्रप्रसाद यांच्या सूचनेवरून आपली भूमिका मांडली.या प्रदीर्घ भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले, 'बर्कने असे कुठे तरी म्हटले आहे की,सत्ता देणे सोपे आहे. शहाणपण देणे कठीण आहे. या सभेला प्राप्त झालेल्या सार्वभौम अधिकाराचा वापर शहाणपणाने करण्याची आपली तयारी आहे.हे आपण आपल्या आचरणाने सिद्ध करू या.देशातील सर्व घटकांना आपल्यासोबत नेण्याचा हा एकमेव मार्ग आहे.एकतेकडे जाण्याचा याशिवाय दुसरा मार्ग नाही. याबाबत आपल्या मनात कुठलीही शंका असता कामा नये.' एकात्म भारताच्या निर्मितीचे हे स्वप्न राज्यघटनेत दिसले पाहिजे आणि देशात सामाजिक आर्थिक,राजकीय न्याय देता आला पाहिजे, 'अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशा...