शिकलेल्या माणसात काही दोष असतात........

_✒📚शिकलेल्या माणसात काही दोष असतात-शिकल्यावर नोकरीच्या पाठीमागे लागणे हा दोष नव्हे-ते दोष व ते अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाहीत याची खबरदारी घ्या.पहिली गोष्ट शिक्षण पुरे झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो.मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे.परंतु शिकलेला मनुष्य स्वतःचे हित पाहतो, समाजाचे पाहात नाही.तो आपल्या बायको-पोरांची व स्वतःच्या हिताचीच काळजी घेतो.मॅझिनी म्हणतो की " लोकात पारतंत्र्य पसरले,माणसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्कांची जाणीव जास्त उत्पन्न होते '' आपले कर्तव्य कोणते, याची भावना जागृत होत नाही हा एक शिकलेल्या माणसाचा दोषआहे.मला खेद वाटतो की शिकलेल्या मनुष्यास पदवी मिळाली आणि त्याला नोकरी लागली की त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ तुटतो. विद्येचे महत्त्व खुटले जाते.मी प्रवास करीत असता मजजवळ नेहमी चार पुस्तके व वर्तमानपत्रे असतात.परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके,वर्तमानपत्रे यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात. मनुष्य बी.ए. झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय? बी. ए. किंवा एम्. ए. झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले,ही भावना चुकीचीआहे.अगस्ती मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटते !_

#डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य