आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *३*
*आम्ही बौद्ध का झालो?*
================
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *३*
--------------------------------
*बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*
मी केसरीत प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाहीर सभेमध्ये दिली. मी असे उत्तर दिले की, माझ्या बांधवांकडे खाण्यासाठी *भाकरी* नाही, शरीर झाकण्यापुरतेही *कपडे* नाही, राहण्यासाठी *घर* नाही, कसण्यासाठी *जमिनही* नाही म्हणून ते अस्पृश्य आहेत, दु:खी आहेत. मग यामागची कारणे काय? मी हा प्रश्न सर्वापुढे उपस्थित केला. पण कोणीही याचे उत्तर देऊ शकले नाही. ज्यांनी केसरी वर्तमानपत्रात लेख लिहून प्रश्न उपस्थित केले होते त्यांनीही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. तेव्हा मी म्हणालो, सद्गृहस्थांनो! आम्ही आमचा स्वतःचा विचार करू जर तुम्हाला आमच्या फायद्याची चिंता असेल तर तुम्ही तुमच्यापैकी एकाला गावी पाठवून मेलेल्या जनावरांना उचलायला सांगा,तुम्हाला त्यापासून रु.५०० लाभ घ्या व याशिवाय मी स्वतः त्या व्यक्तीला ५०० रु.बक्षिस देईन.म्हणजे हे काम करेल त्याला दुहेरी फायदा होईल. *आमचं नुकसान होईल पण तुमचा फायदा होईल.* परंतु आजपर्यंत कोणीही हे काम करण्यास पुढे आला नाही.
*आमची प्रगती पाहून यांच्या पोटात का दुखते हेच मला कळत नाही.* माझ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा संबंधी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. याविषयी तुम्ही चिंता करू नये. या कामाला आम्ही जर केले तर फायदा व तेच काम जर तुम्ही केले तर नुकसान हे कसे काय?
उचला मेलेल्या जनावरांना व फायदा घ्या. याचप्रकारे काही लोकांचे असे म्हणणे आहे की, आम्हाला विधानसभेत काही जागा मिळाल्या तर त्या आम्ही का सोडायच्या? मी यावर म्हणतो ब्राह्मण व राजपुतांनी महार,भंगी, चांभार बनावे व त्या जागा भराव्यात. आमच्या जागा रिकाम्या झाल्या म्हणून तुम्हाला रडण्याचे कारण नाही. मनुष्याला फायद्यापेक्षा स्वतःची इज्जत जास्त महत्त्वाची वाटते. आणि आम्ही सन्मानासाठीच संघर्ष करत आहोत.
क्रमशःवाचा
---------------------------------
✒️ मिशनरी
भिमराव मुनेश्वर.
Comments
Post a Comment