आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *९*

*आम्ही बौद्ध का झालो?*
================
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. *९*
--------------------------------
*बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*
        जेव्हा युरोपमध्ये इसाई धर्माचा प्रचार झाला त्यावेळी रोमच्या आसपासच्या देशाची अवस्था खूप वाईट होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी लोकांसाठी खिचडी वाटली जात असे. त्यावेळी त्यांच्यामध्ये इसाई मताचा प्रचार झाला. दु:खी आणि पिडीत लोक या धर्माचे अनुयायी बनले. *गिबन त्यावेळी म्हणाले होते की इसाई धर्म भिकारी लोकांचा धर्म आहे.* आज इसाई धर्म संपूर्ण युरोपचा धर्म बनला आहे, व याचे उत्तर देण्यासाठी आज गिबन जिवीत नाहीत. जर जिवीत असते तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना आपोआपच मिळाले असते.
        *काही लोक असे म्हणतील की, हा बौध्दधम्म भंगी व चांभारांचा धर्म आहे, ब्राह्मण तथागत बुध्दांना 'भौ'गौतम म्हणूनच बोलवत असत.ब्राह्मण तथागत बुध्दांना याप्रकारे अपशब्द बोलून चिडवत असत.परंतु तुम्हाला माहिती असेल की परदेशात राम,कृष्ण,किंवा शंकर यांची मुर्ती विकण्यास ठेवली तर कोणीही घेणार नाही, परंतु तथागत बुद्धांची मुर्ती ठेवली तर एकही शिल्लक राहणार नाही. भारतात जे झाले, जे होत आहे हे न पाहता भारताबाहेर पहा.जिकडे तिकडे तथागत बुध्दांचे नाव प्रसिद्ध आहे. मग हा धर्म पूर्ण जगात वाढणार यात शंकाच नाही.*
        आम्ही आमच्या मार्गाने जाऊ,ते त्यांच्या मार्गाने जातील. *आम्हाला नवीन मार्ग मिळाला आहे.* हा मार्ग आशेचे प्रतिक आहे. हा मार्ग उत्कर्षाचा महान मार्ग आहे. हा मार्ग नवीन नाही, हा आम्ही दुसरीकडून आणला नाही. हा श्रेष्ठ मार्ग इथलाच आहे. हा मार्ग भारतीय आहे. या देशात *२५०० वर्षापूर्वी बौध्दधम्म होता.* आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्ही हा धम्म अगोदर का स्विकारला नाही. तथागत बुध्दांचा धम्म (तत्व) सार अजरामर आहे. तरीही बुध्दाने असा दावा केला नाही की माझा धम्म अपरिवर्तनीय आहे. या धम्मात वेळेनुसार बदलण्याची शक्ती आहे. एवढी उदारता इतर कोणत्याही धर्मात नाही. या देशात बौद्ध धम्माचा नाश होण्यामागे मुख्य कारण या देशातील मुसलमानांचे अमानवीय आक्रमण होते. या आक्रमणात हजारो मुर्त्या तोडल्या गेल्या. भिक्षूंच्या कत्तली झाल्या या आक्रमणांना घाबरून बौद्ध भिक्खू दुसऱ्या देशात निघून गेले. कोणी कुठे -- कोणी कुठे याचा प्रभाव असा झाला की येथे भिक्खूंची संख्या खूप कमी झाली.
  
       क्रमशः वाचा
---------------------------------
✒️     मिशनरी
      भिमराव मुनेश्वर.

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य