आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. ११
आम्ही बौद्ध का झालो?
================
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. ११
--------------------------------
बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,
दुसरे धर्म आणि 'बौध्दधम्म' यात मोठा फरक हा आहे की, बौध्दधम्मातील महान तत्वे आणि मुळ आधार दुसऱ्या कोणत्याही धर्मात मिळणार नाही. दुसरे धर्म मनुष्याचा व ईश्वराचा घनिष्ठ संबंध आहेत असे दर्शवितात. दुसरे धर्म असे सांगतात की ईश्वराने संसाराची रचना केली आहे. त्यानेच आकाश, वायु, चंद्र, सुर्य आणि सर्व काही निर्माण केले आहे. ईश्वराने सर्वकाही आमच्यासाठी निर्माण केले आहे, काही शिल्लक ठेवले नाही. यासाठी आम्ही ईश्वराची पुजाअर्चा करतो. इसाई धर्माच्या मतानुसार मृत्यूनंतर एक दिवस निर्णयाचा असतो. त्या निर्णयानुसारच सर्व काही निर्धारित होत असते. ईश्वर आणि आत्म्याला बौध्दधम्मात कोणतेही स्थान नाही. तथागत बुद्ध म्हणत असत की जगात दु:ख आहे. नव्वद टक्के लोक दु:खी आणि पीडित आहेत. दु:खाने पीडित असलेल्या लोकांचा उध्दार करणे हा बौध्दधम्माचा मुख्य उद्देश आहे. कार्लमार्क्सने तथागत बुध्दांच्या धम्मापेक्षा जास्त काही सांगितले नाही. तथागत बुध्दाने जे काही सांगितले तो एक साधा व सरळ मार्ग आहे.
बंधुनो आणि भगिनींनो! जे मला सांगायचे होते ते सर्व मी सांगितले आहे. हा धम्म सर्वात चांगला धम्म आहे. या धम्मात कोणताही दोष नाही. हिंदु धर्मात अशी काही तत्वे आहेत. ज्यामुळे कोणालाही उत्साह मिळत नाही. हजारो वर्षांपासून आपल्या समाजातील कोणालाही विद्वान बनु दिले नाही. आपणासमोर माझ्या बालपणीची हकीकत सांगतांना मला कसलाही संकोच वाटत नाही. माझ्या शाळेत एक अब्राह्मण (मराठा) स्त्री होती ती स्वतः अशिक्षित होती, परंतु मला कधीही ती स्पर्श करीत नव्हती. शाळेत असतांना एके दिवशी मला तहान लागली म्हणून मी शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी चपराशीला बोलवून सांगितले, याला नळावर पाणी पाजून ये.चपराशीने नळ खोलला नळ खोलला व मी पाणी प्यायलो.
जर चपराशी नसला तर कित्येक दिवस पाणी प्यायला मिळत नसे. तहानलेल्या अवस्थेतच घरी येत होतो. घरी आल्यावर पाणी प्यायला मिळत असे. जेव्हा मी शिक्षण पूर्ण करून परत आलो तेव्हा मला जिल्हा न्यायाधिश बना असा प्रस्ताव आला. पण या सरकारी नोकरीचा फंदा मी गळ्यात बांधून घेतला नाही. कारण मी सरकारचा नोकर झालो तर माझ्या अस्पृश्य लोकांची सेवा कोण करणार? हा विचार मी केला आणि नोकरीच्या फंदात पडलो नाही.
Comments
Post a Comment