डॉ.भीमरावांनी स्वतः रमाई ना वाचायला आणि लिहायला शिकवलं...
डॉ.भीमरावांनी स्वतः रमाबाईंना लिहिता-वाचता येईल,इतके शिकविले होते. रमाबाई कधीकधी पत्र पाठवून डॉ.भीमरावांना आपले कौटुंबिक वर्तमान कळवीत असत.डॉ.भीमराव रमाबाईंना धीर देणारे पत्रही पाठवीत असत आणि थोडे पैसेही पाठवून देत असत.ते लगेच अभ्यास करण्यात रमून जात असत.एकदा रमाबाईंनी डॉ. भीमरावांचा अभ्यास करण्याचा उत्साह वाढीस लागेल.अशी एक बातमी आपल्या पत्रातन कळविली. डॉ.भीमरावांचे नौकरीला असलेले आणि महिन्याला १२० रुपये पगार घेणारे थोरले बंधू बाळाराम आपल्या कुटुंबीयांसह डॉ.भीमरावांच्या कुटुंबात एकत्र राहू लागल्याची ती बातमी होती.त्या बातमीने डॉ.भीमराव निश्चिंत होऊन आनंदाने अभ्यास करण्यात गढून गेले.
आई_रमाई !
Comments
Post a Comment