अंगुलीमाल
*अंगुलीमाल*
एकेदिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत (सावस्ती) गेला असताना एका मनसेने त्याला विट फेकून मारला. काही माणसांनी त्याच्यावर हल्ला केला.
त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. त्याचे भिक्षापात्राचे तुकडे — तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर उभा राहिला.
तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, "हे सगळे सहन कर . हे सगळे सहन कर"
या प्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला.
मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, "ज्याज्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आस्था दाखवू लागतो; आपले पूर्व जीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वादलातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो."
माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंब करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच एकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात अनावा".
"स्वतःला 'अंगुलिमाल' म्हणवून प्रहावापतीत होऊन मी दरोडेखोराचे जिवन जगत होतो, पण भगवंतांनी त्या प्रहावतून मला किनाऱ्याला आणले. "अंगुलिमाल" म्हणतो मी रक्ताने माखलेला होतो आता माझा उद्धार झाला आहे.
संदर्भ
(बुध्द आणि त्यांचा धम्म)
Comments
Post a Comment