आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. २
आम्ही बौद्ध का झालो?
================
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. २
--------------------------------
बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,
ज्या महान कार्याला मी सुरुवात केली आहे व आपण स्विकारले आहे याची वर्तमानपत्रांनी कडवट टीका केली. त्यांच्या मतानुसार मी माझ्या अस्पृश्य बांधवांना चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे. हे अस्पृश्य लोक कायम अस्पृश्यच राहतील, या धर्मांतराने आमचे काहीही भले होणार नाही. काही वर्तमानपत्रांच्या मतानुसार आज अस्पृश्यांना जे राजनैतिक अधिकार आहेत ते धर्मांतराने समाप्त होतील. हा सर्व वेडगळपणाचा प्रचार आहे. या लोकांचे असे म्हणणे आहे की, आम्ही नवीन मार्गावरून न जाता जो जुना परंपरागत मार्ग आहे त्यानेच जावे. सम्भवत: आमच्या तरुणांवर व वृद्धांवर याचा थोडासा परिणाम पडू शकतो. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देणे मी माझी जबाबदारी समजतो. आणि हा संशय दुर करण्याने आमच्या आंदोलनाला गती मिळेल. आणि म्हणूनच या प्रश्नावर मी बरेच काही बोलू इच्छितो.
महार - चांभारांनी मेलेल्या गायी-म्हशींना उचलू नये आणि त्यांचे मांसही खाऊ नये. याचा प्रचार मी ३० वर्षापूर्वीच सुरू केला होता. या प्रचारामुळे सवर्ण हिंदुना फार मोठा धक्का बसला मी त्यांना विचारले, गायी-म्हशीचे दुध तुम्ही पिणार व त्या मेल्यावर आम्ही त्यांना उचलून बाहेर फेकायचे असं का? जर ते स्वतःची म्हातारी आई मेल्यावर स्वतःच स्मशानात घेऊन जातात तर मग मेलेल्या गायी व म्हशी का उचलून घेऊन जात नाहीत? जेव्हा मी असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले तेव्हा ते खुप चिडायचे.मी त्यांना म्हणायचो,जर तुम्ही तुमची मेलेली आई आम्हाला बाहेर फेकण्यासाठी दिली तर आम्ही तुमच्या मेलेल्या गाईही उचलून घेऊन जाऊ.यावर केसरी (ब्राह्मणांचे वर्तमानपत्र) या दैनिकात एका चित्तपावन गृहस्थाने बरीच पत्रे प्रकाशित करून हे दाखविण्याचा प्रयास केला की, मेलेल्या जनावरांना न उचलल्याने महार व चांभारांचे किती नुकसान होते. यासाठी त्यांनी बरीच आकडेवारी दिली व आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे असे म्हणणे होते की मेलेल्या जनावरांचे शिंग, दात, हाडे इत्यादी विकून महार - चांभारांना वार्षिक रु.५०० ते ६०० मिळतात व मी हे करू नका सांगून त्यांचे नुकसान करित आहे.
एकदा मी संगमनेर (सध्या म्हैसूरमध्ये बेळगावचा एक तालुका) येथे गेलो होतो. तिथे मला ती व्यक्ती भेटली ज्याने केसरीमध्ये ही पत्रे प्रकाशित केली होती. त्या व्यक्तीने मला पुन्हा तेच प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला योग्य वेळी प्रश्नांची उत्तरे देईन असे सांगितले.
क्रमशःवाचा
Comments
Post a Comment