आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. १२

आम्ही बौद्ध का झालो?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६   पोस्ट क्र. १२

बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,
        वैचारिक दृष्ट्या देशातील कोणत्याही वाईट रुढीला विरोध करणे मला कठीण नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मणांनी जो जातीसंस्थेचा पर्वत उभा केला आहे, तो जातीसंस्थेचा पर्वत कोणत्या प्रकारे उलटा करायचा किंवा तोडायचा हा एक वास्तविक प्रश्न आहे? आणि म्हणूनच मला असं वाटतं की या धम्माचे पूर्ण ज्ञान तुम्हाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे आणि या कार्यासाठी मी पुस्तक लिहून तुमच्या सर्व शंका दुर करून तुम्हाला बौद्ध धम्माचे पुर्ण ज्ञान देणार आहे. आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करा.
       आता तुमच्यावर बरीच मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. ही बरीच मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला असे काम करावे लागेल ज्यायोगे सर्वजण तुमचा आदर करतील. तुम्ही या धम्माला स्विकारुन असं समजू नये की, आपण गळ्यात एक मातीचे मडके बांधून घेत आहोत. बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी ओसाड जंगलासारखी आहे आणि म्हणूनच तुम्ही या शुन्यवत पवित्र धम्माचे उत्तम रितीने पालन करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. नाहीतर या धर्म परिवर्तनाची निंदा होईल आज तुम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करा की, बौद्ध धम्म स्विकारुन तुम्ही फक्त स्वत:चेच नव्हे तर स्वतः बरोबर या देशाचे आणि या बरोबर साऱ्या जगाचा उध्दार करायचा आहे. *जगाचा उध्दार बौद्ध धम्मामुळेच होऊ शकतो. जगात जोपर्यंत न्यायाला योग्य स्थान मिळत नाही तोपर्यंत जगात शांतता नांदु शकत नाही.
       हे नविन कार्य खुपच जबाबदारीचे आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी आपण दृढ संकल्प केला पाहिजे. आमच्या तरुणांना बरच काही करायचं आहे. या गोष्टी तुम्ही पुर्णपणे लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुम्ही फक्त पोटाचे पाईक बनु नका. तुम्ही कमीत-कमी आपल्या कमाईचा २० वा हिस्सा या पवित्र धम्म कार्यासाठी देण्याचा निश्चय करा. मला तुम्हा सर्वांना माझ्याबरोबर घेऊन जायचे आहे. तथागतांनी पहिल्यांदा फक्त थोड्याच व्यक्तींना धम्माची दिक्षा दिली व त्यांना आदेश दिला की, या पवित्र धम्माचा प्रचार करा.त्यानंतर 'यश' नावाचा एक विद्वान आणि त्याबरोबर ४० व्यक्तींनी धम्माची घेतली. यश सुध्दा एका श्रीमंत घराण्यातील मुलगा होता. त्यांना तथागत बुद्ध म्हणाले की, हा धम्म "बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकम्पायं आदि कल्याणं,मध्य कल्याणं,पर्यवसान कल्याणं अर्थात बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी आहे आणि सर्व लोकांवर अनुकम्पा करण्यासाठी आहे. हा आदि,मध्य आणि अन्ती कल्याणकारक आहे. तथागतांनी परिस्थितीनुसार धम्मप्रचाराची वेगवेगळी पध्दत सांगितली आणि आम्हालाही वेळेनुसार ह्या धम्माची दिक्षा स्वतः घ्यायला हवी. या गोष्टीची मी घोषणा करतो की, बौद्ध धम्माचा अनुयायी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला त्रिशरण पंचशील आणि २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे.

       ●●●●●

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य