घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य Part 8
घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य💥
भविष्यातील ७०-७५वर्षांत आपण शंभर कोटींचा आकडा पार करणार आहोत आणि त्यामुळे अनेक समस्या वाढणार आहेत,म्हणून त्यांनी कुटुंब नियोजनाचा प्रस्ताव ठेवला.हा प्रस्तावही नाकारला गेला.१९३७ मध्ये विधिमंडळात ही त्यांनी प्रस्ताव आणला होता आणि र.धों.कर्वे यांच्या खटल्याचे वकीलपत्रही याच भूमिकेतून त्यांनी घेतले होते.कृत्रिमरीतीने संतति नियमनांपेक्षा मनोनिग्रहाने व संयमाने संततिनियम करावे.असे १९३७ साली प्रांताचे आरोग्यमंत्री डॉ.गिल्डर यांनी म.गांधींच्या प्रभावातून सांगितले.मुख्यमंत्री ना.खेर यांनी त्याचेच समर्थन करून बिल नाकारले.राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुबंनियोजन आवश्यक आहे म्हणून हा प्रस्ताव संविधान सभेत मांडला तो नाकारला. आम्ही असे पराक्रमी की, प्रस्ताव तर स्वीकारलाच नाही,पण ७०-७५ वर्षांत शंभर कोटींचा अंदाज आम्ही ६० वर्षांत पूर्ण केला.आता देशातील कोणतीही योजना अपुरी पडते. बेरोजगारी,बेकारी,भिकारी,चोरी,मारामारी आणि उपासमारीचा सामना रोजच करावा लागतो.हिंदू कोड बिलासह वरील बिलांशी या देशाचे भवितव्य जोडलेले होते.दलितांच्या समस्यांशी त्यांचा इतरांच्या समस्यांइतकाच संबंध होता.मुळात देशाच्या उन्नतीसाठीचे डॉ.आंबेडकरांचे मन:पूर्वक प्रयत्न होते.या प्रयत्नांनाच आम्ही समजून घेतले नाही. त्याचे गंभीर परिणाम या देशातील सर्वांनाच भोगावे लागताहेत.देशाच्या समस्यांचे परिपूर्ण चिंतन करून मार्ग दाखविणा-या डॉ. आंबेडकरांना देशाचे नेते मानण्यापेक्षा दलितांचे नेते मानण्यात आम्ही धन्यता मानतो.आपले वाटोळे झाले तरी स्थितप्रज्ञ राहाणा-या समाजाला धन्य मानले पाहिजे !
भाग:-सोळावा
अंतीमभाग
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर....
Comments
Post a Comment