आम्ही बौद्ध का झालो? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *६*
*आम्ही बौद्ध का झालो?*
================
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
नागपूर १५ ऑक्टोबर १९५६ पोस्ट क्र. *६*
--------------------------------
*बौद्ध धम्माच्या अनुयायांनो,*
*मनुष्याच्या उत्साहाचे जर कुठलेही कारण असेल तर ते आहे मन* तुम्ही गिरणीमालकांना ओळखत असाल ते गिरणीमध्ये मॅनेजर नियुक्त करतात. त्यांचे काम गिरणी कामगारांकडून काम करवून घेण्याचे असे. ते गिरणीमालक कुठल्यांना कुठल्या व्यसनात गुरफटलेले असतात. कारण त्यांचे मन हे सुसंस्कृत व स्वच्छ नसते.आमच्या मनाचा विकास करण्यासाठीच आम्ही आंदोलन केले. मी शिक्षण कसे पूर्ण केले. गरीबीमुळे मी लंगोटी घालून शाळेला जायचो.शाळेत मला पिण्यासाठी पाणीही मिळत नसे. पाण्याशिवाय मी कित्येक दिवस राहिलो. मुंबईच्या *एल्फिन्स्टन कॉलेज* मध्येही माझी हीच अवस्था होती. *जर अशी परिस्थिती राहिली तर गुलाम कारकुनच तयार होतील. मग अस्पृश्यांची प्रगती कशी होणार?*
ब्रिटिश शासन असताना मी दिल्ली मध्ये एक्जीक्युटीव कौन्सीलर होतो. त्यावेळी भारताचे *व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो* होते. एके दिवशी मी त्यांना म्हणालो,आपण मुसलमानांच्या नावावर अलीगढ विश्वविद्यालयाला तीन लाख रुपये दिले. हिंदुच्या नावावर बनारस विश्वविद्यालयाला तीन लाख रुपये दिले. परंतु *आम्ही ना हिंदु आहोत ना मुसलमान* जर आमच्यासाठी काही करायचे असेल तर याच्याहून कितीतरी पट अधिक खर्च करावे लागतील. जर एवढही आपण करु शकला नाही तर कमीत कमी मुसलमानांसाठी तुम्ही जेवढे करता तेवढेच आमच्यासाठीही करा.या बाबत *लिनलिथगो* मला म्हणाले, तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते मला लिहून द्या, त्यांच्या म्हणण्यानुसार मी एक दस्तावेज लिहून त्यांना दिला, युरोपियन लोक फार सहानुभूतीचे असतात.त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. परंतु या पैशाला कुठल्याप्रकारे खर्च करायचे याचा निर्णय होऊ शकला नाही. त्यांचा असा विचार होता की, पैसे आमच्या समाजातील अशिक्षित मुलांवर खर्च केला जावा. जर त्यांना चांगले जेवण बनविण्यासाठी चांगले साहित्य पाहिजे हे साहित्य कुठून देणार? कारण माझी जनता गरीब आहे. मग ही जनता आपल्या शिक्षित मुलांच्या गरजा भागविण्यासाठी पैसा कुठून आणणार? तेव्हा या शिक्षणाचा काय उपयोग? बाकी सर्व गोष्टींवर सरकारने पैसा खर्च केला, परंतु शिक्षणावर होणारा खर्च बंद केला.
ऐके दिवशी मी *लॉर्ड लिनलिथगो* यांच्याकडे गेलो असता मी शिक्षणविषयक खर्चासंबंधी त्याच्याकडे खुल्या मनाने बोललो मी त्यांना म्हणालो,जर तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक प्रश्न विचारू का? *ते म्हणाले, हो विचारा ना!मी विचारले, काय हे खरं नाही की मी एकटा ५०० ग्रॅज्युएटयांच्या बरोबरीचा आहे.* ते म्हणाले, हो मला मान्य आहे. मग मी त्यांना विचारले यांच कारण काय? यावर ते म्हणाले, मला माहित नाही, तेव्हा मी त्यांना सांगितले की स्वतःच्या मेहनतीने, मी प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे, मी आज सरकारच्या कोणत्याही पदावर बसू शकतो मला अशीच माणसे हवी आहेत जी किल्लावर मोक्याच्या जागी बसून शत्रुला व्यवस्थित टिपतील.याचप्रकारे शासकीय उच्चपदावर बसून माझ्या गरीब लोकांवर देखरेख ठेवतील. त्यांची काळजी घेतील. *जर आमच्या लोकांची प्रगती कायमची करायची असेल तर अशा लोकांना तयार केले पाहिजे तेव्हाच अस्पृश्यांची प्रगती होईल.* केवळ क्लार्कांची पैदास करून काय फायदा?माझ्या या म्हणण्याला लॉर्ड लिनलिथगोनी दुजोरा दिला व त्याच वर्षी१६विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठवले.
क्रमशः वाचा
---------------------------------
✒️ मिशनरी
भिमराव मुनेश्वर.
Comments
Post a Comment