आश्विन पौर्णिमा म्हणजे बौद्धांसाठी एक उत्सवच
आश्विन पौर्णिमा म्हणजे बौद्धांसाठी एक उत्सवच. भगवान बुद्धाने या दिवशी वर्षावास समारोपीय कार्यक्रम दिवस म्हणून बुद्धकालीन युगात या पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध,भिक्खू तथा उपासक-उपासीका धर्माचे (धम्माचे) उपदेश देण्याच्या कार्यासाठी म्हणून प्रारंभाचा दिवस.
आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचे कार्यक्रम असायचे. या तिन्ही पौर्णिमेच्या दरम्यान पावसाळ्याचे दिवस असतात. भिक्खू व भिक्खूणींना धर्माच्या (धम्माच्या) कार्यासाठी गावोगावी, खेळोपाळी, शहरात व पाळे इतरत्र ठिकाणी जाण्यास सक्त मनाई असते.
वर्षावासाच्या काळात पावसाळ्यातील तीन पौर्णिमा अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत आवतनित बौद्धविहार व्यथित करावयाचे असते. या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांना श्रेष्ट भिक्खूद्वारा भगवान बुद्धाचे मार्गदर्शन या काळात नऊ पौर्णिमाचे भ्रमण केलेले भिक्खू आपले अनुभव भगवान बुद्धापूढे मांडत असत. सम्यक तथागत बुद्ध त्यांना प्रश्न विचारत. त्यांच्यातील कमीपणा भरून काढत. या तीन पौर्णिमेच्या काळात फक्त एकदाच रात्रीला जेवण असायचे.
ज्या ठिकाणी भिक्खू आणि भिक्खूनी यांचा संघ एकत्रित असे. त्या ठिकाणी खाण्या-पिण्याची सोयीचा एखाद्यावर जास्त ओझं पडू नये. म्हणून एकच वेळच्या जेवणाचे आदेश बोधिसत्व बुध्दांनी भिक्खू संघाला दिले असायचे.
विशाल करुणेचे सागर गौतम बुध्दांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खूमध्ये कमीपणा असलेले गुण या तीन पौर्णिमेच्या काळात पूर्णतः भरून काढणे, ध्यान साधना करणे, बौद्ध उपासक-उपासिकांना धर्म (धम्म) शिकविणे, उपासकांकडून अष्टपूरस्काराचे धर्म दान स्वीकारणे व उर्वरीत नऊ पौर्णिमा धर्म प्रचार-प्रसाराला घालविणे हे भिक्खुंचे कार्य. दया, क्षमा, शांतीचे जगतगुरु बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले.
बुध्दांनी पंचवर्गीय संन्याश्यांना अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद, चार आर्यसत्य समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ) वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धर्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ट अर्हत भिक्खुंच्या समवेत धर्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन, माझ्या बहुजन हिताय बहुजन सुखाय धर्माची अशी सिंहगर्जना केली.
जेव्हा पासून बुद्धाने आषाढ पौर्णिमेला भिक्खू समवेत प्रथम धर्मचक्र प्रवर्तन इसिपतन मध्ये केला. तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभची सुरुवात त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून वर्षावासाची सुरुवात इसिपटन मध्ये केली. तेव्हा पासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करताना बुद्धाच्या काळात बुद्धाने सर्व भिक्खुना धर्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले. सर्व बौद्ध भिक्खू या काळात गुंतलेले होते.
परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषस्तर पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना समोर जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत. त्यांनी हे सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुध्दांना सांगितले.
सम्यक भगवान बुद्धांनी आदेश दिले की, आषाढ पौर्णिपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्खुंनी एकाच ठिकाणी रहावे. भिक्षेकरिता गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धर्माचे पठण, अध्ययन करावे. यथावत गरज पडली तर, भिक्खू आपल्या गुरूकडून जास्तीत जास्त एक आठवड्याचा वेळ घेऊन, विहारातून बाहेर जाऊ शकतात. बुद्धाच्या काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे.
बुद्धाने पहिले वर्षावास इ.स.पू.५२८ मध्ये सारनाथच्या इसिपटन मध्ये केला. त्यानंतर ४५ वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले.
अश्या प्राचीन गुरुशिष्य परंपरेचे पालन आज ही भारतात तसेच बौद्ध राष्ट्रात थायलंड, म्यानमार, सिरिलंका, कंबोडिया, बांगलादेश येथे पालन करताना दिसतात. त्याचे कालांतराने कालपरत्वे बदल घडून, अपभ्रष्य घडून आजचे स्वरूप प्राप्त झाले आणि आज ती कोजागरी म्हणून साजरी केली जाते.
Comments
Post a Comment