पोस्ट नं 9 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडःभाग पहिला महामायेचा मृत्यू

1) पाचव्या दिवशी नामकरणविधी करण्यात आला , मुलाचे नाव  "सिध्दार्थ "  असे ठेवण्यात आले .त्याचे गौञनाम गौतम होते म्हणून त्याला सिध्दार्थ गौतम या नावाने लोक संबोधु लागले.

2) मुलाच्या जन्माचा आंनदोत्सव व नामकरणविधी चालु असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली आणि तिचे दुखणे बळाऊ लागले.

3) आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखुन तिने राजा शुध्दोदनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असितमुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे . मला दुःख एवढेच वाटते की ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही.

4) माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपुर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षुन त्याची योग्यप्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही.

5) प्रजापती,  माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे . त्याच्या आईपेक्षाही तु त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही.

6) आता कष्टी होऊ नका मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या , देवाचं बोलवणं आलं आहे त्याचे दुत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत . असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुध्दोदन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडुन आक्रोश केला.

7) सिध्दार्थाच्या मातेचा देहवसान झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता.

8) सिध्दार्थाचा नन्द नावाचा एक धाकटा भाऊ होता . शुध्दोदनाचा महाप्रजापतीपासुन झालेला तो पुञ होता.

9) सिध्दार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनुरुध्द हे त्यांचा चुलता शुक्लोदन याचे पुञ  आनंद हा त्यांचा चुलता अमितादन याचा पुञ व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पूञ होता , महानाम हा सिध्दार्थापेक्षा वयाने वडील होता . वा आनंद हा लहान होता.

10) त्यांच्या सोबतीत सिध्दार्थ लहानसा मोठा झाला

क्रमशः पुढील भागात वाचा

बालपण आणि शिक्षण

बुध्द आणि त्यांचा धम्म

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य