पोस्ट नं 8 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडः भाग पहिला

4) असितमुनीचे आगमन 

21) का बरं ? शुध्दोदनाने विचारले ऋषी उतरला " मी वयोवृध्द झालो आहे , माझं आयुष्य आता संपत आलं आहे .निश्चितपणे हे बालक बुध्द होणार असुन ते परमोच्च व " सम्यक सम्बोधी "प्राप्त करुन घेईल . तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करु शकले नाही ते धर्मचक्रप्रवर्तन हे बालक करील .जगाच्या  सुखसंमृध्दीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील.

22) ज्या धार्मिक जीवणाची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्ये कल्याणकारक आणि अन्ती कल्याणकारक असेच असेल ते शब्द व शब्दांचा भावार्थ यांनी परिपुर्ण शुध्द आणि पविञ असेच असेल.

23) ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फुल क्कचित वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते त्याप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुध्द उदयास येतात त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुध्दा निःसंशय परमज्ञान प्राप्त करुन सम्बोधी प्राप्त करुन घेईल आणि असंख्य जीवाना दुःखसागरातुन तरून,नेऊन परमुखाची स्थिती प्राप्त करुन देईल.

24) मी त्या बुध्दाला पाहु शकणार नाही म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निःश्वास टाकीत आहे .कारण मला या बुध्दाची पुजा करावयास मिळणार नाही "

25) तदनंतर राजाने त्या थोर असितऋषीला व त्याचा पुतन्या नरदत्त याला यथायोग्य भोजन,देऊन,संतुष्ट केले त्यांना  वस्ञदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षणा घालुन चालुन वंदन केले.

26).तेव्हा असित मुनी त्यांचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला " नरदत्ता जेव्हा हे बालक बुध्द झाल्याचा तु ऐकशील तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर ते तुला सुखशांन्तीने व कल्याणप्रद ठरेल असे म्हणून असितमुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघुन गेला ......

क्रमशः वाचा ....
 
पुढील भागात वाचा 

महामायेचा मृत्यु ....

प्रत्येक रविवारी सकाळी बुध्द विहारात गेलेच पाहिजे

       विश्वरत्न
डाँ.बाबासाहेब आंबेडकर

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य