पोस्ट नं 6 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडःभाग पहिला


4) असितमुनीचे आगमन

1) ज्या वेळी त्या बालकाचा जन्म झाला त्या वेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता.

2) असित ऋषीने पाहीले की. अंतररिक्षातील देव बुध्द या शब्दांचा ध्वनी करीत आहेत व त्यांचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे .त्यांने पाहीले की ते आपली वस्ञभूषने मिरवित इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत .त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुध्दाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये.

3) त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जंबुव्दिपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुध्दोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असुन त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले.

4) म्हणून तो महान ऋषी  उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुध्दोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशदारी उभा राहिला .

5) तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहीले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि म्हणाला अरे राजाला जाऊन सांगा की दाराशी एक तपस्वी उभा  आहे.

6) तेव्हा तो द्वारपाल शुध्दोदनाजवळ गेला आणि हात जोडुन म्हणाला " महाराजा दाराशी एक वयोवृध्द ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहे.

7) राजाने असितमुनीकरता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो व्दारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असितमुनीला म्हणाला कृपा करुन आत चला.

8) असितमुनी शुध्दोदन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहुन म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तु आयुष्यमान हो आणि आपले राज्य सदधर्माने चालव.

9) तेव्हा शुध्दोदनाने असितमुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले . असितमुनी सुखपुर्वक स्थानापन्न झाल्यावर शुध्दोदन म्हणाला " हे तपस्वी यापुर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतु काय असेल बरे . आपण इथे येण्याचे काय कारण,

10) असित ऋषी शुध्दोदनाला म्हणाला "  राजा तुला पुञप्राप्ती झाली आहे तुझ्या पुञाला पाहण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे.

क्रमशः वाचा ........
     बुध्द आणि त्यांचा धम्म

प्रत्येक रविवारी सकाळी बुध्द विहारात गेलेच पाहिजे

           विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य