डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड - 18 भाग - 1 पृ.क्र - 375 जनता 15 ऑक्टो 1932
गळ्यातील तुळसी माला तुम्हास मारवाड्याच्या कैचीतून मुक्त करण्यास उपयोगी पडत नाही किंवा तुम्ही #राम_नामाचा जप करता म्हणून घरवाला भाड्याची सूट देत नाही अगर वाणी आपले पैसे कमी करीत नाही.
तुम्ही #पंढरीचे_वक्तशीर_वारकरी आहात म्हणून तुमचा मालक तुम्हास पगारात वाढ देत नाही. समाजातील अत्यंत मोठा भाग या मूढ कल्पनात गढून गेल्यामुळे काही आपमतलबी माणसांचा कावा साधतो व ते तुम्हाला सर्वथैव नाडून आपला डाव साधतात. तेव्हा तुम्ही यापुढे तरी अत्यंत सावधगिरीने वागले पाहिजे. आज तुम्हाला थोडी बहुत राजकीय सत्ता प्राप्त होत आहे. त्या सत्तेविषयी जर तुम्ही उदास राहाल, आपली आजची स्थिती बदलण्यासाठी योग्य उपाययोजना न कराल तर तुमचे हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत. '#येरे_माझ्या_मागल्या_आणि_ताक_कण्या_चांगल्या ' ही एक मराठीत म्हण आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही वागाल तर तुमची कधीच उर्जितावस्था होणार नाही. याप्रकारची उदासीनता व मनाची प्रवृत्ती ही तुमच्या #उर्जितावस्थेस अत्यंत विघातक आहेत आणि मला मोठी शंका येते ती हीच की, आज आपल्यात जागृती होत आहे ती क्षणिक ठरून जर विराम पावली तर काय ? ज्या गुलामगिरीस नेस्तनाबूत करण्यास आज आपण सज्ज झालो आहोत तिचा पगडा परत तुमच्यावर बसणार नाही ना ? आजपर्यंत #वैष्णवपंथी_संत जनांनी तुम्हास समानतेच्या पायरीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची शिकवणूक सर्वस्वी पारमार्थिक स्वरूपाची असल्यामुळे व ते स्वत: ऐहिक सुखापासून अलिप्त राहिल्यामुळे ते आपला सामुदायिक दर्जा वाढवू शकले नाहीत. त्यांच्या शिकवणुकीने तुमच्या #गुलामगिरीत काडीचाही फरक पडला नाही. हिंदुस्थानातील बहुजन समाज राजकारणापासून अलग राहिल्यामुळे आज देशास दुर्दशा प्राप्त झाली आहे. तरी त्या चुकीची पुनरावृत्ती आपण न करता #अत्यंत_जागरूकतेने पुढील कार्यक्रम आखला पाहिजे...
📖संदर्भ -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे
खंड - 18 भाग - 1 पृ.क्र - 375
जनता 15 ऑक्टो 1932
✍️संकलन -- अॕड. दि. सि. सोनार्लीकर
गणतीच माझी गुलामात होती
जिंदगीचं माझी सलामात होती,
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती,
मला दावलेली तुझी पायवाट
झाली आता विकासाची वाट,
वदे आज भारत काळाची तुझी ती
पेरणी उद्याच्या विकासात होती....
जय_भीम
भोळसट_कल्पनांमुळे_इहलोकातील_खडतर_आयुष्यक्रम_कष्टमय_झाला_आहे
Comments
Post a Comment