पोस्ट नः 158 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा
*3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( iv )*
------------------
*49) निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही . निब्बाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे, यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता*.
*50) निब्बाण हा निर्दोष जीवणाला प्रतिशब्द आहे हे बुध्दांनी राधला एके ठिकाणी स्पष्ट करुन सांगितले आहे*
*51) एकदा स्थविर राध तथागतांकडे गेला. तथागतांना आभिवादन करुन त्यांच्या समीप बसुन त्यांनी विचारले. तथागत निब्बाण म्हणजे काय ?*
*52) तथागतांनी उत्तर दिले " निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन,*
*53) तथागत, परंतु निब्बाणाचा उद्देश काय ?*
*54) राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे*
*55) निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुध्दांनी सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे.*
*56) एकदा तथागत श्रावस्तीतील अनाथ पिंडिकाच्या आश्रमात आले होते . सारीपुत्त त्या ठिकाणी राहत होता.*
*57) भिक्खुना उद्देशुन तथागत म्हणाले , भिक्खुनो ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा . तुमच्याविषयी वाटणारया करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणुन मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे.*
*58) असे बोलुन तथागत आपल्या गंधकुटीत निघुन गेले*
*59) सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्षुंनी त्यांला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.*
*60) तेव्हा सारीपुत्त म्हणाला, लोभ हा द्वेष आहे , व्देष हा दोष आहे.*
*61) हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यममार्ग आहे , हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो , तो आपणाला शांती , अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याकडे नेतो*
*62) हा मध्यममार्ग कोणता? हा मध्यममार्ग म्हणजे अष्टांगमार्ग होय त्याशिवाय दुसरा मार्ग नाही , सम्यक दृष्टी , सम्यक संकल्प, सम्यक वाणी , सम्यक कर्मान्त , सम्यक आजीविका , सम्यक प्रयत्न ( व्यायाम ) , सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी . भिक्षूंनो हा मध्यममार्ग आहे.*
*63) होय क्रोध, द्वेष, ईर्षा, मत्सर ,कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उध्दटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दृष्ट विकार आहेत.*
*64) मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यममार्गाने होतो. त्यांच्या योगाने पहायला दृष्टी मिळते हा मार्ग आपणाला पाहयला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती देतो अभिज्ञा बोधि आणि निब्बाण याकडे नेतो*
*65) निब्बाण हे दुसरे तिसरे काही नसुन आंष्टागमार्ग आहे*
*66) अशा रितीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना हे ऐकुन आंनद वाटला.*
*67) निब्बाणात जो मुलभुत विचार आहे तो आष्टांगर्माग . अष्टांगमार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही*
*68) प्रवृतींचा संपुर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यममार्ग आहे.*
*69) हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबधीच्या गोंधळाचा निरास होईल.*
*" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द विहारात " सकाळी " गेलेच पाहिजे "*
*********************
*विश्वरत्न*
*डाँ.बाबासाहेब आंबेडकर*
*INDIA THAT IS BHARAT*
☸☸☸☸☸☸☸☸
Comments
Post a Comment