पोस्ट नः 156 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग तिसरा


*18) भिक्खुंनो !चक्षुरिद्रिय हे पेटलेले आहे, चक्षुसंस्कार हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव ही पेटलेली आहे, चक्षुसंस्कारापासुन उदभवणारया सुखकारक दुःखकारक अदूःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत*

*19) आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत*

*20) त्या रगाग्नीने द्वेषाग्नीने मोहाग्नीने जन्म जरा मृत्यु दूःख दौमर्नस्य त्याप्रमाणेच उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत*

*21) भिक्खुंनो ! श्रोत्रेद्रिय जळत आहे शब्द जळत आहे ज्ञानेद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे ,रस जळत आहे. शरीर जळत आहे ,चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत , चितसंस्कारापासुन ज्या सुखवेदना दुःखवेदना अदुःखवेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत*

*22) आणि या कशामुळे जळत आहे*

*23) त्या रागाग्नीने मोहाग्निने जन्म जरा मृत्यु दुःख दौर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत*

*24) हे जाणल्यावर , भिक्षुंनो ! प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा ( विरक्ती )  उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदि विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते*

*25) निब्बाणामुळे सुख कसे मिळते? या दुसरया प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे*

*26) एक सर्वसामान्य समजुत आहे कि माणसाला पुरेसे मिळाले नाही कि तो दुःखी होतो. परंतु ही समजुत त्रिकाळ सत्य नाही , भोवती समृध्दी आणा संपन्नता असुनसुध्दा मनुष्य दुःखी राहतो*

*27) हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रींमत या दोंघाच्याही जीवनाचा शाप आहे*

*28) हा विचार भिक्खुंना दिलेल्या एका प्रवचनात तथागत बुध्दांनी स्पष्ट केला आहे*

*29) लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध मोहाने मुढ* *झाल्यामुळेमाणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवु लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात*

*30) परंतु जर लोभ राग मोह यांचा पुर्ण उच्छेद केला तर माणुस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही त्याचप्रमाणे दुसरयाच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवीत नाही*

*31) आणि असे झाले की बंधुनो ! ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुध्दीवान श्रावकानांच साध्य असे ते निब्बाण जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते*

*क्रमशः*
      *रोज वाचा*
" *बुध्द आणि त्यांचा धम्म* ". 
*पुढील पोस्ट मध्ये वाचा*

 *"निब्बाण प्राप्त करणे हा  धम्म आहे "*( ii)

*1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "*
********************* 
           *विश्वरत्न*
   *डाँ.बाबासाहेब आंबेडकर*

     *INDIA THAT IS BHARAT*
         
☸☸☸☸☸☸☸☸

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य