पोस्ट नः 152 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा

धम्म म्हणजे काय ?


*1) जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म*

             ( *क*  ) 


*1)  जीवन शुचितेचे तीन प्रकार आहेत.  देहशुचिता, म्हणजे काय?*

 

*2) माणसाने हिंसा , चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासुन विरत होणे याला देहशुचिता म्हणतात*. 


*3) वाकशुचिता म्हणजे काय?* 


*4) वाकशुचिता म्हणजे असत्य भाषणापासुन विरत होणे*


*5) आणि मनःशुचिता म्हणजे काय ?*


*6) मनःशुचितेत भिक्षुला कामवासना झाल्यास कळते की, आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते . त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पादन होते. आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते.*


*7) त्याच्या ठिकाणी द्वेष*

 *( व्यापाद ) उत्पन्न झाल्यास त्याला  कळते*


*8) त्यांच्या ठिकाणी आळस तंद्रा ( स्त्यान मृध्द) उध्दतपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितीचा उदगम कसा होतो . त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहीत चित्ता कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक शुचिता* 


*9) जो काया वाचा मन शुध्द पवित्र आहे जो निष्पाप स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे*

 

*10) त्याला लोक निष्कलंक म्हणतात*


        ( *ख* )

*1) शुचितेचे तीन प्रकार आहेत, कायेची ,वाचेची आणि मनाची शुचिता .*


*2) कायेची शुचिता म्हणजे काय?*


*3) कायाशुचितेत मनुष्य हिंसा चोरी काम मिथ्याचार यापांसुन परावृत्त होतो, याला कायाशुचिता म्हणतात*


*4) वाकशुचिता म्हणजे काय ?* 


*5) वाकशुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यापासुन दुर राहतो. त्याला वाकशुचिता म्हणतात*, 


*6) मनःशुचिता म्हणजे काय ?*


*7) मनःशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्षा यापांसुन परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो ,याला मनःशुचिता म्हणतात, शुचितेचे हे तीन प्रकार आहेत,*


*क्रमशः* 

*रोज वाचा*

*" बुध्द आणि त्यांचा धम्म ".* 

*पुढील पोस्ट मध्ये वाचा*


 " *धम्म म्हणजे काय* " 


*1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे*" 

********************* 

           *विश्वरत्न*

   *डाँ.बाबासाहेब आंबेडकर*

*INDIA THAT IS BHARAT*

☸☸☸☸☸☸☸☸

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य