पोस्ट नं 10 बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडःभाग पहिला

बालपण आणि शिक्षण

1) जेव्हा सिध्दार्थ चालु बोलु लागला, तेव्हा शाक्यातील वयोवृध्द जाणते लोक एकञ जमले व त्यांनी शुध्दोदनाला सांगितले कि मुलाला अभया या ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहीजे.

2) शुध्दोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले.

3) ती त्याला कपडे करीत !असताना बाळ सिध्दार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेत आहे हे आपल्या मावशीला विचारले . जेव्हा त्याला समजले कि आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रितीरिवाजानुसार तो देवळात गेला.

4) वयाच्या आठव्या वर्षी सिध्दार्थाच्या विद्याभ्यासास सुरवात झाली.

5) महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुध्दोदनाने ज्या आठ ब्राह्यणांना बोलविले होते व ज्यांनी सिध्दार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारभींचे गुरु झाले होते.

6) त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिध्दार्थाला शिकविल्यानंतर शुध्दोदनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परपरां असलेल्या सब्बमिताला बोलावून घेतले ,सब्बमित हा भाषाशास्ञ व्याकरणशास्ञ वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुध्दोदनाने  त्याच्या हातावर  सुवर्ण कलशातुन उदक प्रदान करुन सिध्दार्थाला अध्ययनासाठी त्यांच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु.

7) त्यांच्या हाताखाली सिध्दार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन शास्ञे आत्मसात केली.

8) याशिवाय त्याने आलारकालामाचा शिष्य भारद्वाज याजकडुन ध्यानधारणेची विद्या संपादिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तु येथे होता.

रोज वाचा
बुध्द आणि त्यांचा धम्म

प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहीजे

         विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर

Comments

Popular posts from this blog

Know Your Ambedkar #4

घटनेचे शिल्पकार आणि देशाचे भवितव्य